आवाज महाराष्ट्राचा!
मीडियाच्या बाजारात सामान्य माणसाला न्याय हवा. तो शासन, प्रशासनाकडे खेटे घालतो. तरी प्रश्न सुटत नाहीत. शिक्षण, आरोग्य, न्याय महागले. आयुष्य जगणे कठिण झाले. त्याला न्याय हवा. अशा माणसाला दिलासा देण्याचा एक छोटा संकल्प. त्याचे नाव 'Voice Of Maharashtra' होय.

समाजकारण दिखावी झाले. राजकारणात त्याग, समर्पणाची संकल्पना बदलली. देशभक्तीची भाषा बदलली. अर्थकारणात लुट वाढली. जात-धर्माचे राजकारण वाढले. लोकशाहीची परिभाषा वादग्रस्त होत चालली. या संभ्रमावस्थेत चौथ्यास्तंभाकडून अपेक्षा वाढल्या. त्यातही भांडवली आगमन झाले. पुन्हा एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची नवी जबाबदारी वाढली. देशातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी , कष्टकरी, शहरी आणि ग्रामीण माणूस चिंतातूर आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. सरकार दरबारी त्यांच्या प्रश्नांची सोडवूक व्हावी. महाराष्ट्र राज्याचा आवाज दिल्लीत बुलंद व्हावा. विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत.

सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणे. त्यासाठी आवाज उचलणे. पाठपुरावा करणे. ही जबाबदारी पत्रकारांनी समर्थपणे पेलावी. निर्भिड, स्वतंत्र व स्वाभिमानी पत्रकारितेचे मुल्य जोपासले जावे. यासाठी ही धडपड. पत्रकारांचा सामुहिक खटाटोप. संविधान प्रेमींच्या पाठिंब्याने सोशल मीडियात पदार्पण. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय'च्या संकल्पासह...!