वाचकांची आम्ही काळजी घेतो...

VOM या संकेतस्थळाला बिनधास्त भेट द्या आणि विविधांगी वाचनाचा आनंद लुटा. वाचकांचे खासगीपण आम्ही जपतो. तुमच्या इच्छेविरुध्द तुमच्याशी संबंधित कोणताही मजकूर किंवा माहिती आमच्याकडे जमा करून ठेवली जात नाही. तुम्ही काही माहिती डाऊनलोड केली, तर त्यातील तुमचा खासगी तपशील आम्ही जमा ठेवत नाही. किती वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली, कोणते ब्राउजर वापरले, इंटरनेट सेवा कोणत्या कंपनीची आहे, कोणती माहिती वाचली, डेस्कटँबवरून भेट दिली की मोबाईलवरून ही माहिती मात्र स्वयंचलितपणे जमा होत राहते. त्यातून आम्ही वाचकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो.

आमच्या बातम्या मिळविणे किंवा तत्समदृष्टीने स्वत:हून काही माहिती दिली तर ती आमच्याकडे असते. यामध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, तुमचे आवडीचे विषय आदींचा समावेश आहे. त्याआधारे आपणास बातम्या पाठविणे. प्रतिक्रिया व्यक्त करणे आदींसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, ही माहिती अन्य कुणाला पुरविली जात नाही.

त्रयस्थ संकेतस्थळ

आमच्या संकेतस्थळावर दिसणारा मजकूर अन्य संकेतस्थळ लिंक असेल तरी दिसतो. पण खासगीपणासंदर्भात त्या संकेतस्थळाचे धोरण वेगळे असू शकते. त्यांचे धोरण त्यांच्या संकेतस्थळावर जाऊनच तपासावे लागेल. त्यांचे धोरण आम्ही सांगू शकणार नाही. परंतु, आमचे धोरण मात्र वाचकांचे खासगीपण जपण्याचे आणि गोपनीयता पाळण्याचे आहे आणि ते नेहमीसाठी तसेच राहील.

आमच्या संकेतस्थळावर नामांकित संस्थांच्या थर्डपार्टी जाहिराती प्रसिध्द होत असतात. जाहिराती देताना त्या संस्था तुमच्या ब्राउजरवर कुकिज ठेवू शकतात. या संस्था तुमचे ई- मेल, नाव, पत्ता ,तुमच्या सवयी, तुमची फँशन अशी माहिती जमा करू शकतात. या माध्यमातून या संस्था विविध उत्पन्नाच्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहचवू शकतात. या थर्डपार्टी संस्थांवर मात्र आमचा अंकुश नाही, हे स्पष्ट केले पाहिजे.

थोडे तक्रारीबाबत...

तुमचे खासगीपण जपण्याबाबत काही उल्लंघन झाल्यास तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकता. योग्य तक्रारींचे निराकरण केले जाईल. त्यासाठी खाली नमूद केलेल्या तक्रार निवारण (ग्रिव्हीयन्स) अधिकाऱ्याकडे आपण लिखित किंवा info@voiceofmaharashtra.in या ई-मेलवर तक्रार करू शकता.

राहुल पांडे

ग्रिव्हीयन्स अधिकारी,

मोबाईल 09823046119

पत्ता:-
पत्रकार भवन,
पंचशील चौक,
धंतोली , नागपूर-440012
M.H. Email:-
info@Voiceofmahtra.in
mob-071-2422558

तक्रारीत खालील माहिती हवी-

  • १- तक्रारकर्त्याचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक
  • २-संबंधित मजकुराची लिंक, बातमीचे शीर्षक, दिनांक, तक्रारीचा विषय
  • ३-माहिती व्यक्तिगत/सामाजिक/ धार्मिक यापैकी कोणत्या बाबतीत संवेदनशील आहे याचा स्पष्ट उल्लेख हवा.
  • ४- जोडलेली माहिती अलिकडील काळातील आहे आणि ती खोटी नाही असे प्रतिद्न्यापत्र सादर करावे लागेल.
  • ५- तक्रारीसोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपशीलवार माहिती
  • ६- आपली तक्रार व सोबतची माहिती बिनचूक असावी.
  • ७- आमच्या गोपनीयतेच्या धोरणाबाबत आपणास काही आक्षेप किंवा शंका असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता
  • ८- वर उल्लेख केलेल्या व्यक्तीशीच संपर्क साधावा. अन्य व्यक्तीच्या माध्यमातून साधलेला संपर्क ग्राह्य धरला जाणार नाही.
  • ९- तक्रारीबाबत गोपनीयता ठेवली जाईल.