ताज़ा खबर

शाहरुख खानचा बायजूला बाय-बाय, एडटेक कंपनीच्या अडचणीत वाढ

Shahrukh Khan Byjus : सतत कर्मचारी कपात, संचालक मंडळातील सदस्यांचे राजीनामे आणि ईडीच्या तपासादरम्यान एडटेक प्लॅटफॉर्म बायजूला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. सध्या निर्माण झालेल्या या वादांमुळे सुपरस्टार शाहरुख खानही बायजूसोबतचा करार पुढे चालू ठेवणार नसल्याचे बोलले जात आहे. शाहरुख खान हा बायजूचा ब्रँड अॅम्बेसिडर आणि भागीदारही आहे. बायजूसच्या सर्व जाहीरातींमध्ये त्याचा चेहरा दिसतो.
निधी उभारण्यासाठी बायजूने खर्चात कपात केली आहे, ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात टाळेबंदी केली जात आहे. दरम्यान, शाहरुख खानला एडटेक फर्मसोबतचा करार सुरू ठेवण्यात रस नाही. एडटेक प्लॅटफॉर्म गंभीर अडचणीत असल्याने शाहरुखची टीम ब्रँडशी संलग्न राहण्यास देखील कचरत आहे, असे एका व्यक्तीने सांगितले.
बायजूसने २०१७ मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (SRK) ला सुमारे ४ कोटी रुपयांच्या वार्षिक फीसाठी साइन केले आणि तेव्हापासून तो एडटेक प्लॅटफॉर्मचा सर्वात जास्त चर्चेतला चेहरा आहे. शाहरुख खानसोबत बायजूच्या नात्यावर विपरीत परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी एप्रिलमध्ये, मध्य प्रदेशातील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने बायजू आणि अभिनेत्याला शैक्षणिक मानकांची पूर्तता न केल्याबद्दल आणि खोट्या जाहिरातींसाठी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
बायजूसोबतचा संबंध सुरू ठेवल्याबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर या अभिनेत्याला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. त्याच वेळी, २०२१ मध्ये, शाहरुखचा मुलगा आर्यनशी संबंधित वादाच्या वेळी बायजूने शाहरुख सोबतच्या जाहिराती बंद केल्या. इंडस्ट्री पर्यवेक्षक म्हणतात की सेलिब्रिटीज नैसर्गिकरित्या ब्रँड्स किंवा विवादांना तोंड देत असलेल्या कंपन्यांपासून स्वतःला दूर ठेवतात.
लॉयड मॅथियास, बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट आणि पेप्सिकोचे माजी मार्केटिंग हेड म्हणाले की, अशा तीव्र तपासणीत ब्रँडशी संबंध जोडणे कोणत्याही मोठ्या नावासाठी हानिकारक ठरेल. गेल्या अनेक महिन्यांपासून बायजूने शाहरुखशी संबंधित कोणतीही नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही.

Releated