ताज़ा खबर

तीन दिवसीय विश्वशांती परिषदेचे नागपुरात आयोजन -विविध राष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम *

नागपूर, दि.11- संघकाया फाउंडेशन, इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन, दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्ट , ग्लोबल युनायटेड एज्युकेशनल अँड सोशल सोसायटी आणि शताब्दी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५,१६ व १७  मे -2026 रोजी विश्वशांती परिषदेचे आयोजन नागपूरात करण्यात आले आहे.या परिषदेमध्ये श्रीलंका,म्यानमार ,थायलेंड,साऊथ कोरिया,नेपाल, भूतान, जपान, व्हियतनाम, बांगलादेश आणि लाओस या ठिकाणीतील मुख्य धार्मिक नेत्यांना आमंत्रित केल्या गेले अशी माहिती भंते प्रशिलरत्न गौत्तम यांनी दिली.
 ते म्हणाले,  याबाबत सर्वांचे स्वीकृती पत्र प्राप्त झालेली आहे. या परिषदेला विविध धर्मातील धर्मगुरू, विद्वान, सामाजिक व राजकीय नेते यांना आमंत्रित केल्या गेले आहे. दि. १५  मे २०२६ रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग या ठिकाणी कार्यक्रमाचे उदघाटन श्रीलंकेचे बुद्ध शासन मंत्री विजयदासा  राजपक्षे यांच्या हस्ते होईल. यावेळी बांगलादेश, साऊथ कोरिया आणि श्रीलंकेचे संघनायक  कार्यक्रमांमध्ये विशेष अतिथी म्हणून आमंत्रित राहतील.
     दुसऱ्या दिवशी १६मे २०२६ रोजी वसंतराव देशपांडे सभागृह, सिविल लाईन ,नागपूर या ठिकाणी  सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमातंर्गत  श्रीलंका, बांगलादेश, भारत आणि म्यानमार देशातील सांस्कृतिक कलेच्या (नृत्य आणि गायन) सादरीकरण करण्यात येईल. तसेच दिनांक 16 व 17 मे 2026 रोजी सायंकाळी 7  वाजता इंदोरा मैदान उत्तर नागपूर मैदान या ठिकाणी संगीतमय मेजवानी असेल.यात  डॉ.धनश्री राजेश बुरबुरे आणि अभिजीत कोसंबी भाग घेतील. या 2 दिवसात थायलंड देशातील सुप्रसिद्ध गायिका सिस्टर अनिमिता बौद्ध सांस्कृतिक वरील कार्यक्रम सादर करणार आहे. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भंते प्रशिलरत्न गौतम यांनी  केले आहे.पत्रकार परिषदेमध्ये रमेश वानखेडे, रत्नदीप रंगारी, स्मिता वाकडे,क्षितिज गायकवाड, दिनेश शेंडे आदी उपस्थित होते.

Releated

Latest News!